जगन्नाथ पंडित
जगन्नाथ पंडित - वाराणसीला सूर्यास्ताला गंगेची आरती बघण्यासाठी दशाश्वमेध घाटावर माणसांची आणि घाटाच्या समोर गंगेच्या पात्रात होड्यांची गर्दी झाली होती . दिवसभरच्या काशीदर्शनाने मनात कुठे तरी निराशा आली होती. इथेही घाटावर लोकांची आणि पाण्यात होड्यांची गर्दी झाली होती. सगळ्या होड्या एकमेकीना चिकटुन चिकटुन उभ्या होत्या . टोपल्यामधे काहीतरी विकायला घेऊन आलेल्या बायका , छोटी मुलं लाटांवर वरखाली होणार्या होड्यांमधून एका होडीवरून दुसर्या होडीवर लीलया फिरत होती . दरवेळी त्यांच्या पाय ठेवण्याने होडी थोडीशी पाण्यात अजुन खाली जाई पाय उचलला की वर येई . डचमळणार्या होड्यांवर लीलया फि...
Comments
Post a Comment