बाधति बाधते ।
बाधति बाधते । भोजराजा आणि कालिदासाच्या प्रेमाच्या, चातुर्याच्या अनेक गोष्टी प्रचलित आहेत. कालिदासाच्या प्रकांड बुद्धिमत्तेचे वैषम्य वाटून त्याला वादविवादात भोजराजाच्या राजदरबारातच राजासमोर हरविण्यााठी आणि राजाने ठेवलेले बक्षिस जिंकण्याच्या इच्छेने अनेक जण भोज राजाच्या धारानगरीत यायचे. पण कालिदासाला हरविण्यापूर्वीच कालिदासाचे श्रेष्ठत्व उमगून गुपचूप परत तरी जायचे नाहीतर कालीदासाला भेटून मोकळ्या मनाने त्याची माफी मागून, त्याचं शिष्यत्व पत्करून, त्याच्याकडे राहून, अभ्यास करून , शहाणे होउन तरी जात. असाच एक विद्वान फार लांबून पालखीत बसून धारा नगरीकडे येत होता. अचानक त्याच्या भोयाचा पाय मुरगाळला आणि दुसरा भोई घेण्याची वेळ आली. अचानक भोई कुठून मिळणार? म्हणून मग रस्त्यावरच हिंडणार्या एका माणासाला काही मोबदला देण्याच्या बोलीवर भोयाचे काम करण्यासाठी निश्चित करण्यात आले. ह्या नवीन माणसाने पूर्वी कधी भोयाचे काम न करण्याने तो वारंवार थांबत होता. पालखीत बसलेला विद्वान वजनदार असल्यामुळे मधे मधे पालखीचा दांडा ह्या खांद्यावरून त्या खांद्यावर करण्यासाठी इतर भोयांना थ...