ठंठंठ ठंठं ठठठं ठठं ठः।
ठंठं ठ ठं ठं ठठठं ठठं ठः । राजा भोज आणि कालिदासामध्ये असलेले नितांत प्रेम भोजराजाच्या दरबारातल्या विद्वानांना अजिबात रुचत नसे. आम्ही एवढे श्रेष्ठ विद्वान असताना राजाने त्या कोण कुठल्या कालीदासावर जीव ओवाळून टाकावा; आम्ही श्लोक रचले तरी कालिदासाच्याच श्लोकांची स्तुती करावी हे त्यांना अजिबात मान्य नसे. बरे तो कधी दरबारात वेळवरही येत नसे. बर्याच वेळला हमखास उशीरा तर, कधी येतही नसे. हा कोण कुठला? त्याच्या ना नावाचा पत्ता, ना गावाचा, ना कुळाचा, ना त्याच्या आचार्यांचा! कालिदास दिसायला अत्यंत देखणा होता. त्याच्या रूपावर अनेक स्त्रिया भाळत. एकेकाळी अत्यंत देखण्या पण अज्ञानी कालिदासाचं लग्न एका हुशार, संस्कृत पंडित राजकुमारीशी झालं होतं. पण लग्नाच्या पहिल्याच रात्री तिला आपला पति अत्यंत मूढ आहे हे लक्षात येताच तिने त्याला राज्याबाहेर घालवून दिलं होतं. अशा काही चुटपुट गोष्टी सर्वांच्याच कानावर होत्या. कालिदास परत कधी आपल्या राजकुमारी पत्नीकडे न जाता गणिकांकडे जात असे हे सर्वच दरबारी लोकांना खटकणारे होते. त्यावेळी अशा गृहस्थाला समाजात मानाचे स्थान नसे. लोक क...