देवी कामाक्षी, मूकशंकर आणि मूकपञ्चशती -
देवी कामाक्षी , मूकशंकर आणि मूकपञ्चशती - दक्षिण भारतात कांची नगरात घडलेली ही कथा . कांची नगरात फार पुरातन असे कामाक्षी मंदीर आहे . का म्हणजे सरस्वती . मा म्हणजे लक्ष्मी . अक्ष म्हणजे डोळे . सरस्वती आणि लक्ष्मी हे ज्या देवीचे डोळे आहेत अशी ती कामाक्षी . थोडक्यात विद्या यश आणि सम्पत्ती देणारी ही देवी आहे . आपल्या गोष्टीचा कालावधी साधारणपणे आद्य शंकराचार्यांचा जो कालावधी होता त्या सुमारास किंवा थोडासा नंतरचा आहे . कांचीला विद्यावती नावाची ज्योतिष शास्त्रात पारंगत स्त्री होती . तिचा पतीही ज्योतिष शास्त्राचा चांगला अभ्यासक होता . त्या दोघांचा एकुलता एक मुलगा होता . त्याचं नाव शंकर ! शंकर हा जन्मजात बहिरा आणि मूका होता . त्यामुळे सारेजण त्याला मुका शंकरच म्हणत असत . हा मुका शंकर कामक्षीदेवीच्या मंदिरात रोज जाऊन बसत असे . देवीच्या चेहर्याकडे तासन् तास बघत बसणार्या शंकराच्या मनात काय चालू आहे हे मात्र कोणाला कळत नसे . सकाळपासून रात्रीपर्यंत त्याचा वेळ देवीचा चेहरा न...