मैत्रीची परतफेड
मैत्रीची परतफेड एक छानशी गोष्ट माझ्या वाचनात आली. प्रत्यक्षात भागवतात असल्याचे मला आठवत नाही. पण वाचताना मित्रप्रेमाची साक्ष देणारी वाटली. ती माझ्या शब्दात लिहून काढली इतकच! एकदा महर्षी विश्वामित्र ऋषी सांदिपनींच्या आश्रमात आले. त्याचवेळी आश्रमातले शिष्य फळ-कंदमुळं गोळा करायला वनात गेले होते. कृष्ण आणि सुदामाही बाकी शिष्यांसोबत वनात गेले होते. महर्षींचं स्वागत करायला आश्रमात पाणी आणि आसनाशिवाय बाकी काहीच सामग्री नव्हती. सांदिपनींनी विश्वामित्रांना पाय धुवायला पाणी आणि बसायला आसन दिलं. आपले शिष्य थोड्याच वेळात रानातून ताजी फळं, कंदमुळं व रानमेवा घेऊन येतील तोवर थोडा विश्राम करावा; त्यानंतर आपला श्रमपरिहार होण्यासाठी लगेचच ताजा रानमेवा मिळेल असे सांगून आपण लगेचच काही खायला देऊ शकत नाही ह्या बद्दल विश्वामित्रांकडे दिलगिरी व्यक्त केली. पण विश्वामित्रच ते! आसन ग्रहण करत विश्वामित्रांनी ध्यान लावलं असता सांदिपनींच्या पत्नीने कृष्णासाठी मुठभर पोहे जपून वेगळे ठेवले असल्याचं त्यांना लक्षात आलं. महर्षींना संताप आला आणि म्हणाले, ‘‘ठिक आहे. तुमच्याकडे जे मूठभर पोहे जपून...